Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (09:18 IST)
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले.नगर लोकसभा मतदारासंघासाठी मंगळवारी (दि.23) निवडणूक होत आहे.
 
मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्‍लक असल्याने, प्रचारासाठी सर्वच उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे.या धावपळीत निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे  खर्चाच्या हिशेबाचा मेळ घालता घालता उमेदवारांची दमछाक होत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवाराला 70 लाख रुपयांचा निवडणूक खर्च करण्याची मुभा भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.सभांसाठी आवश्यक साहित्य, खुर्च्या, टेबल तसेच जेवणावळी, चहा, नाश्ता आदींसाठी विविध खाद्यपदार्थांचे दर आयोगाने ठरवून दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तात्काळ निवडणूक खर्चाचे मीटर सुरु होते. उमेदवार वा राजकीय पक्षांच्या सभेत वा रॅलीत कोणकोणत्या वस्तू वा गाड्या वापरल्या जातात,याची पाहणी करण्यासाठी निवडणूक विभागाने विविध पथके तयार केली आहेत. उमेदवारांच्या खर्चावर या पथकांची बारीक नजर आहे. 
 
उमेदवारांचा झालेला खर्च 
 
नामदेव वाकळे 50998, डॉ. सुजय विखे 4534515, आ. संग्राम जगताप 3046176, कलीराम पोपळघट 25800, धीरज बताडे 14630, फारुख शेख 28300, सुधाकर आव्हाड 34993, संजय सावंत 30700, आप्पाासाहेब पालवे 25800, कमल सावंत 102838, दत्तात्रय वाघमोडे 26200, भास्कर पाटोळे 27257, शेख आबीद हनीफ 55480, साईनाथ घोरपडे 34249, ज्ञानदेव सुपेकर 57444,  संजीव भोर  63650, संदीप सकट 19390, श्रीधर दरेकर 33145 रुपये.

संबंधित माहिती

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती

भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

पुढील लेख
Show comments