suvichar

सुप्रिया सुळे यांचे मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Webdunia
पवार कुटुंबीयावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नसत नसल्‍याचे म्‍हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे प्रचार सभा घेऊन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 
 
सध्या सर्वसामान्य जनतेचे मुळ मुद्दे बाजुला ठेवण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे. असा सवाल करत देशाचे पंतप्रधान एखाद्या कुटुंबावर हल्ला करतात, म्हणजे त्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत, अशी टीका सुळे यांनी मोदींवर केली आहे.
 
तसेच  सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे मी मोठ्या अपेक्षाने पाहत होते. पंतप्रधान पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यामुळे देशातील विकासाबद्दल, बेरोजगारी आणि महागाईवर मोदी स्पष्टीकरण देतील, असे मला वाटत होते. पण पवारांवर टीका केल्या शिवाय प्रसिद्धी मिळत नसल्याचे सांगत पवार घराण्यावर झालेला हा हल्ला दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: अकोल्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

भंडारा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू

LSG vs PBKS : आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स मध्ये खेळला जाणार

मोदी सरकारने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करून महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली

पुढील लेख
Show comments