Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ, या लोकसभेची कसर भरून काढू- फडणवीस

devendra fadnavis
, मंगळवार, 4 जून 2024 (20:23 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या निकालांवर भाष्य केलं आहे.
 
ते लिहितात, "पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो!
 
इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या."
 
पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो.
 
या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !"
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गडकरी पंत प्रधान, नागपुरात घोषणाबाजी, संघ मोदींऐवजी गडकरींवर डाव लावू शकतो का?