Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक्झिट पोलनुसार युपीएचे पारडे जड

भाषा
निवडणुक संपली नि सगळ्या टिव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोलचा भडीमार सुरू झाला. पण या सगळ्या पोलचा लसावि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (युपीए) पारडे जड असल्याचाच निघाला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागेल, तर तिसरी आघाडी तिसर्‍या क्रमांकावरच राहिल असे चित्र या पोलमधून स्पष्ट झाले.

न्यूज एक्स व एसी नीलसन यांच्या एक्झिट पोलनुसार युपीएला १९९ जागा मिळतील. त्यात कॉंग्रेसच्या १५५ जागा असतील. एनडीएला १९१ जागा मिळतील त्यात भाजपच्या १५३ जागा असतील.

हेडलाईन्स टुडेच्या एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेस व त्यांच्या घटक पक्षांना १९१, तर एनडीएला १८० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. डाव्यांच्या जागा साठवरून ३८ पर्यंत खाली येण्याचा अंदाजही या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

इंडिया टिव्हीने घेतलेल्या पोलनुसार युपीएला १९५ ते २२७ पर्यंत जागा मिळतील. यात राष्ट्रीय जनता दल, लोजपा व समाजवादी पक्षाच्या ३२ जागा आहेत. या चॅनेलला एनडीएला १८९ जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे.

युटिव्ही व आय चॅनेल यांनी युपीएला १९५, सपा, लोजपा व राजद यांना मिळून युपीएला २२७ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. एनडीएला १८९ जागा मिळतील असे अनुमान बांधले आहे.

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या.

राजकीय पक्षांनी आपले स्वतःचेही सर्वेक्षण केले आहे. कॉंग्रेसने स्वतःला २१८ जागा मिळतील, असा अंदाज बांधला आहे, तर भाजपला १९४ जागा मिळतील असा होरा व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या सर्वेक्षणात युपीएला १७० तर स्वतःला २१५ जागा मिळतील असा अंदाज बांधला ाहे.

तिसर्‍या आघाडीचे महत्त्वही अबाधित राहिल असेही या एक्झिट पोलवरून दिसतेय. न्यूज एक्सच्या म्हणण्यानुसार, तिसर्‍या आघाडीला १०४, तर इतरांना ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. हेडलाईन्स टुडेने तिसर्‍या आघाडीला १०० हून अधिक, तर इंडिया टिव्हीने ११३, कॉंग्रेसच्या सर्वेक्षणात १०१ व भाजपच्या सर्वेक्षणात १२५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

चौथ्या आघाडीचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी या आघाडीतील सपाला २६, राजदला २४, तर लोजपाला ४ जागा अशा सर्व मिळून ६४ जागा मिळाल्या होत्या. आता या पक्षांच्या जागा निम्म्यापर्यंत खाली येतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

न्यूज एक्सने चौथ्या आघाडीला ३६ जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. यात सपाला २६, लालूंच्या राजदला ८, व लोजपाला २ जागा मिळतील. इंडिया टिव्ही, हेडलाईन्स टुडे, युटिव्ही- आय या तिन्ही चॅनेल्सच्या सर्वेक्षणात या आघाडीला ३२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करणयात आला आहे. भाजपने चौथ्या आघाडीला ३३ तर कॉंग्रेसने ३० जागा मिळतील असा होरा बांधला ाहे.

न्यूज एक्सच्या दुपारी दोनपर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार युपीएतील घटक पक्ष राष्ट्रवादीकॉंग्रेसला ९, द्रमुकला १५, तृणमूलला १२, राजदला ८ व लोजपाला २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


दुसरीकडे एनडीएला १९१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करताना, भाजपला १५३ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. गेल्या वेळी भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. या आघाडीतील संयुक्त जनता दलाला १७, शिवसेनेला ९, अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाला ३, आसाम गण परिषदेला चार जागा मिळतील.


न्यूज एक्सच्या म्हणण्यानुसार तिसर्‍या आघाडीला १०४ जागा मिळतील. इतरांना ४८ जागा मिळतील. माकपला मोठा फटका बसणार असून त्यांच्याकडे गेल्यावेळच्या ४३ जागांच्या तुलनेत २५ जागा रहाण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलाला १० जागा मिळू शकतील.

बसपाच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून १९ वरून हा पक्ष २८ जागांवर उडी घेण्याची शक्यता आहे. सपाची ३६ वरून २६ पर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊच्या म्हणण्यानुसार युपीएला १९८ जागा मिळतील. त्यात कॉंग्रेसला १५४ जागांचा अंदाज आहे. त्याचवेळी एनडीएला १८३ तर भाजपला यातील १४२ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. तिसर्‍या आघाडीला ११२ जागा मिळण्याचा अंदाज असून डाव्यांना ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात ५० जागा जाऊ शकतात.

स्टार न्यूजच्या म्हणण्यानुसार युपीएला १९९, यात कॉंग्रेसला १५५ जागा मिळतील. एनडीएला १९६ व भाजपला १५३ जागा मिळू शकतील. तिसर्‍या आघाडीला १०० तर इतरांना ४८ जागा मिळू शकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

Show comments