Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसर्‍या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

वेबदुनिया
लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी राज्यातील दहा मतदार संघासह देशातील १०७ मतदारसंघात मतदानास सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांच्यासह देशातील १५६७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

तिसर्‍या टप्प्यातील महत्त्वाच्या उमेदवारांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, सेक्युलर जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा, केंद्रिय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल आणि ज्योतिरादित्य शिंदे, विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा समावेश आहे.

तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह, गुजरातमधील सर्व २६, मध्य प्रदेशातील १६, उत्तर प्रदेशातील १५, पश्चिम बंगालमधील १४, बिहार, कर्नाटकमधील १० आणि जम्मू-काश्मीर, सिक्कीम, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव येथील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होईल.

महाराष्ट्रातील दहा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांतील मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणीसाठी १६ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Show comments