Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसर्‍या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान

वार्ता
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी गुरूवारी (ता. २२) बारा राज्ये व केंद्र शासित प्रदेशातील १४० मतदारसंघात मतदान होत आहे. १९ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार २०४१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

या टप्प्यात महाराष्ट्रातील २५, आंध्र प्रदेशातील २०, उत्तर प्रदेशातील १७, मध्य प्रदेशातील १३, बिहारमधील १३, आसाममधील ११, ओरीसातील ११, झारखंडमधील ८, गोव्यातील २, त्रिपुरातील २ व जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होईल. मणिपुरच्या एका जागेसाठी आज मतदान झाले.

दुसर्‍या टप्पयात जार्ज फर्नांडिस (मुजफ्फरपुर), राहुल गांधी(अमेठी), सुषमा स्वराज (विदिशा), शरद पवार (माढा), सुप्रिया सुळे (बारामती), रामविलास पासवान, (हाजीपुर) लालू प्रसाद यांचे मेव्हणे साधु यादव ( पश्चिम चंपारण), विनय कटियार (आंबेडकरनगर), गोपीनाथ मुंडे (बीड), सुरेश कलमाडी ( पुणे), प्रकाश झा (पश्चिम चंपारण) यांचे भवितव्य ठरेल.

दुसर्‍या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार बहूजन समाज पक्षाचे आहेत. १२२ उमेदवार या पक्षाचे आहेत. कॉंग्रेसचे ११७, भाजपचे ११३, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २३, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १७, राष्ट्रीय जनता दलाचे १५ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ९ उमेदवार आहेत.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments