असं म्हणतात जाको राखे साईया मार सके न कोय, म्हणजे ज्याचे रक्षण हरी करतो त्याला कोणीही मारू शकत नाही. सोशल मीडियावर सध्या अनेकदा अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात. या मध्ये अपघातातून देखील लोक बचावतात. सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकापच उडतो. हा व्हिडीओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
<
Mother & Father both fell from the bike but bike went ahead with baby around 500 mts and dropped the baby safely in the bushes of the road Divider
May Lord Krishna protect us always like this pic.twitter.com/X3W3jRVYwE
रस्त्यावर चालताना वेगाने वाहन चालवताना अपघात घडतात. अनेकदा वाहने सावकाश चालवण्याचा सल्ला देऊन देखील लोक निष्काळजी प्रमाणे वाहन चालवून आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये दुचाकीवर पती पत्नी आपल्या चिमुकल्यासह वेगाने जात होते. समोरून वेगाने येणारा एक दुचाकी स्वार त्यांना धडकतो. या मुळे ते पती पत्नी जागीच पडतात. आणि बाईकवर पुढे बसलेला चिमुकला बाइकसह खाली न पडता वेगाने पुढे जातो. सुमारे 500 मीटर गेल्यावर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडते आणि या अपघातातून चिमुकला सुखरूप बचावतो. हा व्हिडीओ अंगाला थरकाप आणणारा आहे. हा व्हिडीओ 57 सेकंदाचा असून 13 हजार हुन अधिक लोकांनी पहिला आहे.