Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

akash ambani
मुकेश अंबानीने नुकतेच आपला मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाचे कार्ड वाटले. आकाश अंबानी याचा विवाह 9 मार्च रोजी होणार आहे. आकाश त्याची बालमैत्रिणी श्लोक मेहतासोबत लग्न करणार आहे. आकाशच्या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहे. 
 
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात गुजराती लोक गायिका फाल्गुनी पाठक हिने विशेष परफॉर्मेस दिली होती. पूर्ण अंबानी कुटुंबीयांनी दांडिया खेळले. या पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत.
 
या पार्टीमध्ये अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही जवळचे नातेवाईक सामील झाले. मुकेश अंबानी यांची आई कोकीलाबेन गुलाबी साडीमध्ये सुंदर दिसत होत्या. तसेच टीना अंबानीने सीग्रीन रंगाची साडी परिधान केली होती.  
webdunia
फाल्गुनी पाठकने आपल्या गाण्यांसह माहोल सजवला. लग्नाचे फंक्शन तीन दिवसांपर्यंत चालतील. 9 मार्चला दुपारी  3.30 वाजता आकाशची वरात निघणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपासून जिओ वर्ल्ड सेंटर येथे लग्न विधी सोहळा सुरू होईल. 10 मार्चला विवाह साजरा केला जाईल. 
 
11 मार्च रोजी अंबानी-मेहता कुटुंब जिओ सेंटर येथे रिसेप्शन देणार आहे. लग्नात देशातून आणि परदेशातून मोठे ख्यातनाम पोहोचतील. मिळालेल्या माहितीनुसार, 23 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान आकाश बॅचलर पार्टी देखील देणार आहे. ही पार्टी स्वित्झर्लंडच्या सेंट मैरिएट्स मध्ये होईल. करण जौहर आणि रणबीर कपूर सारख्या मोठ्या कलाकारांना पार्टीमध्ये आमंत्रित केले गेले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KFC मध्ये जेवल्यानंतर 200 लोकं रुग्णालयात दाखल, सर्व रेस्टॉरंट बंद