Marathi Biodata Maker

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला 2 मिलिअन व्ह्यूज

Webdunia
बुधवार, 20 जुलै 2022 (08:38 IST)
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आज हे गाणं सारेगम या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. 'वो तेरे प्यार का गम' असं या गाण्याचं नाव आहे. 'माय लव्ह' या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे. अमृता यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' हे जुन्या गाण्याचंच रिक्रिएटेड वर्जन आहे
 
'वो तेरे प्यार का गम' या गाण्याच्या रिक्रिएट वर्जनचे बोल अमृता फडणवीस यांचे आहेत. तसेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्या स्वतः हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता यांनी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. हे नवं गाणं ऐकता काहींनी त्यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
 
या गाण्याला 5 तासांमध्येच 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 'माय लव्ह' या चित्रपटामधील हे गाणं याआधी आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. तर सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी ते गायलं होतं. आता अमृता यांनी पुन्हा या गाण्याच्या आठवणींना आपल्या आवाजाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात मतदार यादीत 5 हजार 'डुप्लिकेट' नावे आढळल्याने गोंधळ

नाशिक तपोवन वृक्ष वाचवा; उद्धव ठाकरेंनी ही झाडांची हत्या असल्याची टीका केली

दक्षिण सीरियातील एका गावावर इस्रायलचा हल्ला, १३ जणांचा मृत्यू

पाच मुलांची आई आधी प्रियकरासोबत पळाली, नंतर घरी परतून मुलं वाटून घेतले

2 आणि 3 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर

पुढील लेख
Show comments