rashifal-2026

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द

Webdunia
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (09:09 IST)
वादग्रस्त पुस्तकांच्या पडताळणीसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ श्री रामदास स्वामी’,गोपीनाथ तळवलकर लिखित ‘संतांचे जीवन प्रसंग’ही दोन पुस्तके रद्द करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत पुरवण्यात आलेल्या सर्वच पुस्तकांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली. 
 
एकभाषिक पुस्तकांच्या योजनेमधील लाखे प्रकाशन, नागपूर यांच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकामधून संभाजीराजांची बदनामी करण्यात आली आहे, अशाप्रकारचा आक्षेप घेण्यात आला. तसेच प्रतिभा प्रकाशनच्या, गोपीनाथ तळवळकर लिखित ‘संतांचे जीवन प्रसंग’या पुस्तकामधून संत तुकाराम व त्यांच्या पत्नीसंबंधी अवमानकारक मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष आणि डॉ. गणेश राऊत, पांडुरंग बलकवडे सदस्य असलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत या पुस्तकांची पडताळणी करून पुस्तके रद्द करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवार आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केली! महाराष्ट्रात मोठा बदल, लवकरच होणार घोषणा

तुर्कीमध्ये मोठा विमान अपघात, लिबियाच्या लष्करप्रमुखांसह सात जणांचा मृत्यू

राष्ट्रीय ग्राहक दिन 2025 : 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा होतो, इतिहास , महत्त्व जाणून घ्या

ओव्याचे पाणी छातीतून श्लेष्मा काढते, पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

नाशिकमधील नमोकार तीर्थ देशातील प्रमुख जैन केंद्र बनणार, फडणवीस सरकारने ३६ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली

पुढील लेख
Show comments