Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांची जागा किचनमध्ये म्हणण्यार्‍या Burger King ने मागितली माफी

महिलांची जागा किचनमध्ये म्हणण्यार्‍या Burger King ने मागितली माफी
, बुधवार, 10 मार्च 2021 (11:55 IST)
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्ताने अमेरिकन ब्रँड बर्गर किंगने केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर त्याची खूप थू थू झाली. नंतर बर्गर किंगने यासाठी माफी मागितली आणि वादग्रस्त ट्वीट डिलीट केले. 
 
बर्गर किंगने ट्वीट केले की "आम्ही आपलं ऐकलं. आम्हाला आमचं पहिलं ट्वीट चुकीचं वाटलं म्हणून ते काढलं जात आहे. आम्ही मान्य करतो, की आमची चूक झाली. आमच्या ब्रिटनमधील किचनमध्ये केवळ 20 टक्के महिला आहेत. महिलांचं लक्ष या बाबीकडे वेधलं जावं अशी आमची इच्छा होती. तिथलं लिंग गुणोत्तर आम्हाला सुधारायचं आहे.
 
उल्लेखनीय आहे की महिला दिनावर बर्गर किंगने एका ट्वीटमध्ये लिहिले होते की 'महिलांची जागा किचनमध्ये'. यानंतर लोकांनी जगभरात असलेल्या या फूड चेन संचालित करणार्‍या कंपनीला ट्रोल करायला सुरु केले होते. तरी कंपनीने आपल्या ट्वीटमध्ये उत्तर देत म्हटले होते की 'आमच्या किचनमध्ये केवळ 20 टक्के शेफ महिल आहे. जर त्या आमच्याशी जुळू इच्छित असल्यास त्यांचे स्वागत आहे. आम्ही या क्षेत्रात महिलांची संख्या वाढून लिंग प्रमाण बदलू इच्छित आहे. आम्ही यासाठी मोहिमेवर आहोत.' 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल चाहरला टी-20 मध्ये मिळू शकेल संधी