Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

'छोटा भीम' कार्टून दूरदर्शनवर दाखवणार

Chhota Bhim
, शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (21:55 IST)
लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रेक्षक आवर्जून बघत आहेत. आता  चॅनलची लोकप्रियता बघता बच्चेकंपनीसाठी देखील खुशखबर आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा प्रसारित करण्यात आलेले छोटा भीम हे कार्टून देखील दूरदर्शनवर दाखवले जाणार आहे. डीडी नॅशनलच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली. 
 
छोटा भीम बच्चेकंपनीमध्ये खूप लोकप्रिय आहे. वॉर्नर मीडियाची मालकी असणाऱ्या लहान मुलांच्या पोगो या चॅनलसोबत पार्टनरशिप करून छोटा भीम दूरदर्शनवर प्रसारित केले जाणार आहे. डीडी नॅशनल चॅनलवर ‘छोटा भीम’ या कार्टुनचे प्रसारण सुरू झाले असून त्याची वेळ दररोज दुपारी २ वाजेपासून असणार आहे. ३ मे पर्यंत असणारा लॉकडाऊन संपेपर्यंत छोटा भीम कार्टुनचे दूरदर्शनवर प्रसारण केले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' सर्व क्षणांची विक्रमी नोंद झाली