Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील सर्वात किमती घर

जगातील सर्वात किमती घर
, रविवार, 27 मे 2018 (12:42 IST)
'व्हिला ले' सीडर ही 187 वर्षांपूर्वी निर्माण केली गेलेली भव्य वास्तू आता विक्रीकरिता उपलब्ध झाली असून, दक्षिण फ्रान्सच्या  समुद्रकिनार्‍यालगत सेंट जीन कॅप फेरात ह्या ठिकाणी ही वास्तू उभी आहे. हे घर 18,000 चौरस फूट इतक्या जागेमध्ये असून, ह्या घराला चौदा शयन कक्ष आहेत. पस्तीस एकर विस्ताराच्या भूखंडावर हे विशालकाय घर वसलेले आहे. ह्या घराचे निर्माण 1830 साली करण्यात आले असून, याच्या सभोवताली ऑलिव्हज्‌ची पैदास होत असे. 'विलेफ्राशे-सूर-मेर' ह्या गावाच्या प्रतिनिधींचे हे घर होते. त्यानंतर प्रतिनिधींच्या परिवारजनांनी हे आलिशान घर बेल्जियचे राजे दुसरे लिओपोल्ड ह्यांना 1904 साली विकले. हे घर वसलेली भूखंडावर रबराची झाडे लावली गेली होती, तसेच ह्या भूखंडामध्ये अनेक धातूंच्या खाणी होत्या. रबर आणि धातूंच्या खाणींच्यामार्फत राजे लिओपोल्ड ह्यांनी प्रचंड संपत्ती कमविली. 1924 मध्ये हे घर मार्निर लापोस्तोल ह्यांच्या मालकीचे झाले. हे घर ह्या परिवाराच्या ताब्यात 2016 सालापर्यंत होते. त्यानंतर मार्निर ह्यांची कंपनी विकत घेणार्‍या डेव्हिड कॅम्पारी मिलानो ह्यांच्या मालकीचे हे घर झाले. आता ह्या घरची विक्री करायच्या उद्देशाने ह्या घरासाठी 350 मिलियन पाऊंड इतकी किंमत ठरविली गेली आहे. ह्या घराचा विस्तार प्रचंड असून किती वस्तूंनी हे घर सजविलेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत