Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोव्याच्या गायी तळलेल्या मासोळ्या खाऊन मासांहारी झाल्या, पाच दिवसात होती शाकाहारी

गोव्याच्या गायी तळलेल्या मासोळ्या खाऊन मासांहारी झाल्या, पाच दिवसात होती शाकाहारी
शाकाहारी लोकांना मासांहारी बनताना आपण बघितलं असेल परंतू काय आपण मासांहारी गायींबद्दल ऐकले आहे. नसेल ऐकले तर जाणून घ्या. असा दावा गोव्यात वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो यांनी केला आहे. त्यांना दावा केला आहे की आवारा फिरत असलेल्या गायी नॉन व्हेज खात आहे त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार केला जात आहे. या गायींना आता शाकाहारी करण्याची प्रक्रिया केली जात आहे. त्यांनी सांगितले की कलंगुट गावातील 76 आवारा गायींना गोठ्यामध्ये आणले जेथे त्यांना चणे आणि इतर शाकाहारी भोजन दिलं जात आहे.
 
उत्तर गोव्यातील अरपोरा गावातील एका कार्यक्रमात मंत्री लोबो म्हणाले की कलंगुट येथील गायी मासांहारी झाल्या आहेत. त्या चारा आणि शाकाहारी आहार घेत नाहीये त्यामुळे त्यांच्यावर उपचार केला जात आहे. चार-पाच दिवसात त्या पुन्हा शाकाहारी होतील.
 
लोबो यांच्याप्रमाणे येथील गायी फेकण्यात येणार्‍या तळलेल्या मासोळ्या आणि फ्राइड राईस खात होत्या. हॉटेलमध्ये उरलेलं पदार्थ खाऊन गायींचे सिस्टम माणसांसारखे झाले आहे. आधी या केवळ शाकाहारी पदार्थ खात होत्या आणि मासांहारी पदार्थाचा वास घेऊन त्याला तोंड न लावता पुढे निघून जायच्या मात्र आता आता त्या केवळ नॉन व्हेज खात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मतदान LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स