सड़क पर गिरी मछली, मच गई लूट#बिहार pic.twitter.com/ZleUZpDOp2
— Hari krishan (@ihari_krishan) May 28, 2022 >रस्त्यावर मासे पडताना पाहून आजूबाजूच्या गावात एकच गोंधळ उडाला आणि रस्त्यावर पडलेले मासे लुटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.अधिकाधिक मासे गोळा करण्यासाठी काही बादली आणि काही गोणी घेऊन तिथे पोहोचले. कोणाकडे सॅक होती, तर कोणी फक्त वाटी आणि थाळी घेऊन तिथे पोहोचले. त्याच्या घरी जमेल तेवढे नेले. यादरम्यान कोणीतरी मासे लुटण्याच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.