Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर प्रदेश: अंत्ययात्रेत डीजेवर खांदेकरी नाचले

Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (10:31 IST)
social media
कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याशी संबंधित सर्वजण येतात. त्यांच्या जाण्याने प्रत्येकजण दु:खात असतो. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून कुटुंबीयही रडतात. काही लोक शोक व्यक्त करण्यासाठी येतात. पण कुणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणारे डीजेच्या तालावर नाचत आहे याची कल्पना देखील करता येत नाही. पण मृत व्यक्तीची शेवटची इच्छा तशीच होती. 

उत्तर प्रदेशातील झाशीच्या मौरानीपूर शहरात राहणाऱ्या लोहपीत कुटुंबाने मोठ्या थाटामाटात आपल्या ज्येष्ठाची अंत्ययात्रा काढली. या वेळी अंत्ययात्रेत केवळ डीजे वाजवण्यात आला नाही तर महिला आणि नातेवाईकांनीही जोरदार नृत्य केले.
, मौरानीपूर येथे राहणाऱ्या भटक्या लोहार कुटुंबातील वडील करणबीर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.
 
मृत्यूपूर्वी करणबीरने आपल्या कुटुंबियांकडे इच्छा व्यक्त केली होती की, जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत डीजे वाजवावा. यानंतर करणबीरचा मृत्यू झाल्यावर त्यांची  शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी अंत्ययात्रेत डीजे वाजवला आणि महिलाही डीजेच्या तालावर नाचल्या.
 अंत्ययात्रेत उपस्थित कुटुंबातील महिला आणि नातेवाईकांनी नृत्य करून करणबीरला अखेरचा निरोप दिला. करणबीरची अखेरची यात्रा पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडले.याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला असून आता पर्यंत सुमारे 92 लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे. 
 
 
 




Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट शरद पवार यांनी घेतली

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments