Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Garba In Swimming Pool: उदयपूरच्या स्विमिंग पूलमध्ये महिलांचा अनोख्या शैलीत गरबा, व्हिडीओ व्हायरल

Webdunia
रविवार, 25 सप्टेंबर 2022 (13:17 IST)
Garba In Swimming Pool: सध्या देशभरात नवरात्री आणि गरब्याची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबरला होत असून 5 ऑक्टोबरला संपणार आहे. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवादरम्यान, भक्त माँ दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. यावेळी गरबाही साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. यावेळी अश्विन शुक्ल प्रतिपदा 26 सप्टेंबरला आहे. या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आता नवरात्र पूर्ण नऊ दिवसांची आहे कारण कोणत्याही तिथीचा क्षय नाही. नवरात्रीतील मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक नृत्य ‘गरबा’. गुजरातमध्ये गरबा अधिक साजरा केला जातो.सध्या देशभरात नवरात्रोत्सवात गरबेचे आयोजन केले जाते. नवरात्रीच्या काळात दांडियाची क्रेझ संपूर्ण भारतात कायम आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे महिला स्विमिंग पूलमध्ये गरबा करताना दिसल्या.
 
राजस्थानमधील उदयपूरमध्ये लोक गरब्याची तयारी फिल्मी आणि अनोख्या पद्धतीने करत आहेत. उदयपूरमध्ये, क्रिएशन ग्रुपच्या सदस्यांनी सिटी ऑफ लेक्समधील शाळेतील स्विमिंग पूलमध्ये गरबा केला.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुलांनी दर्शन रावलच्या 'लवयात्री' चित्रपटातील 'चोगडा' या हिट गाण्यावर गरबा सादर केला,  सदस्यांनी गरबा पोशाख आणि दागिने परिधान करून स्विमिंग पूलमध्ये गरबा सादर केला. जलतरण तलावात गरबा करणाऱ्यांनी सांगितले की, जलतरण तलावात गरबा करणे सोपे नव्हते, पण आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते आणि आमच्या झोकून आणि मेहनतीने आम्ही ते केले.
 
 हा एक मिनिट 26 सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत 38 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mahrashtra Exit Polls : महाराष्ट्रात महायुती की एमव्हीए? एक्झिट पोलनंतर गोंधळ वाढला

Balasaheb Shinde Died: बीडचे उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Exit Poll Result 2024: झारखंडमध्ये कोणाचे सरकार, एक्झिट पोल काय सांगतात?

Exit Poll 2024 महाराष्ट्रात सरकार कोण बनवणार, एक्झिट पोल काय सांगतात?

LIVE: महाराष्ट्रात मतदान पूर्ण झाले

पुढील लेख
Show comments