Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सीमाप्रश्नी सुनावणी

Webdunia
मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (09:16 IST)
सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाच्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती ए. के. शिक्री, न्यायमूर्ती अशोक भास्कर, न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.  यापूर्वीची सुनावणी 1 ऑक्टोबर 2017  रोजी झाली होती. महाराष्ट्राच्या वतीने अ‍ॅड. दातार भूमिका मांडण्याची शक्यता आहे. अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव त्यांना मदत करतील.
 
महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालय आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 29 मार्च 2004 रोज दाखल केला आहे.  त्यावर आक्षेप घेणाारी याचिका कर्नाटकाने दाखल केली असून त्यावर पहिल्यांदा सुनावणी होणार आहे.
 
महाराष्ट्राकडून दाव्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. दाव्याबाबत साक्षीदारांची निश्‍चिती झाली असून ते साक्षीसाठी सज्ज आहेत. खटल्यातील महाराष्ट्राचे वकील अ‍ॅड. हरिष साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडावी, यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीकडून  सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात दिल्ली आणि कोल्हापूर येथे खासदार शरद पवार यांची भेट घेण्यात आली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments