Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येडियुरप्पांनी घेतली शपथ

येडियुरप्पांनी घेतली शपथ
, गुरूवार, 17 मे 2018 (08:47 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणुकी नंतर येडियुरप्पा यांनी  बंगळुरू येथे राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. येडियुरप्पा हे तिसर्‍यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले आहेत. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर  कोर्टाने मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टानं  शपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत.

मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदिल दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.

न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक: सरकार स्थापनेचे भाजपला निमंत्रण