Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hop Shoots जगातील सर्वात महाग भाजी, किंमत ऐकून हैराण व्हाल

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (12:22 IST)
जगभरात अनेक भाज्यांचे उत्पादन होतं आणि शक्योतर भाज्यांची किंमत अशी असते जी आपल्याला परवडते परंतू सर्वात मौल्यवान भाजीबद्दल आपल्याला माहित आहे का जी आपल्या ताटात पडावी यासाठी लोन घेण्याची गरज देखील भासू शकते. या भाजीची किंमत अशी आहे की श्रीमंत लोकं देखील खरेदी करण्यापूर्वी एकदा तरी नक्कीच विचार करतील. Hop Shoots या भाजीचं नाव असून नुकतीच बिहारमधयए याची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 
Hop Shoots ची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात हॉप शूट्सला मोठी मागणी असून 1 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 87 हजार रुपये ते 1 लाख रुपये इतका किलोसाठी भाव आहे. सहा वर्षांपूर्वी देखील याच भावाने आंतरराष्ट्रीय बाजारात ही भाजी विकली जात होती.
 
या भाजीचं फुलं देखील अनोखे
या हिरव्या भाजीचं फुलं देखील स्वादमध्ये चांगलं आहे. या फुलंना 'हॉप कोन्स' (Hop Cones) म्हणतात. हे फुलं बीअर बनविण्यासाठी वापरण्यात येतात. 
 
आरोग्यासाठी फायदेशीर
याचे औषधी फायदे अनेक आहे. टीबी, कर्करोग सारख्या आजारांच्या उपचारावर उपयोगी असण्याबरोबरच महिलांच्या मोनोपॉज सारख्या समस्येवर देखील फायदेशीर आहे. अनेक औषधी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 
जर्मनीहून सुरु झाली होती याची लागवड
याची भाजी केली जाते तसेच कच्ची भाजी देखील खाल्ली जाते. याच्या डहाळ्या नाजुक असतात ज्याने सॅलडच्या रुपात देखील वापरण्यात येते. याचे लोणचे देखील घातले जाते. उल्लेखनीय आहे की 800 ईस्वीचे लोक बीअरमध्ये घालून याचे सेवन करत होते. याची शेती उत्तरी जर्मनी येथून सुरु झाली आणि आता संपूर्ण विश्वात याची लागवड होऊ लागली. 

बिहारमध्ये उत्पादन
इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इंस्टीट्यूट वाराणसीमध्ये या हॉप शूट्सची लागवड केली जाते. या पिकामधून इतर पिकांच्या तुलनेत 10 पट अधिक फायदा होता असल्याचं शेतरकी म्हणतात.
 
महाग असल्याचे कारण
या पिकाचं संपूर्ण वापर होतो. पानांचा वापर भाजीप्रमाणे केला जातो तर फळ, फुल आणि मुळांचा वापर देखील केला जातो. बिअर तयार करण्यासाठी तसेच औषधी उदयॊगांमध्ये अँटिबायॉटिक तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या पिकाचे उत्पादन करणे खूप अवघड काम आहे. या पिकाचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते याचबरोबर याच उत्पादन आणि निगा राखणं खूप अवघड काम आहे. अतिशय दुर्मिळ आणि कमी उत्पादन होत असल्यानं याची किंमत जास्त असल्याचं म्हटलं जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी, सरकारी पिस्तूल व मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार

अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त, भारतीय नौदलाने केली मोठी कारवाई

पुढील लेख
Show comments