Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय नौदलाच्या जवानांना 'Thanks'

भारतीय नौदलाच्या जवानांना 'Thanks'
, सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (15:40 IST)
केरलच्या कोच्चीमधील अलवा येथे भारतीय नौदलाने सुजीता जबेल या गर्भवती महिलेबरोबरच अन्य एका महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले. यानंतर नौदलाच्या जवानांनी तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. सुजीताला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. अन् सुजीताने एक गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर या बचाव कार्याचा व्हिडीओ तसेच सुजीता आणि तिच्या बाळाचे फोटो तुफान व्हायरल झाले. 
 
आता  स्वत:चा जीव धोक्यात टाकून सुजीता आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना सुजीताच्या कुटुंबाने अनोख्या पद्धतीने धन्यवाद म्हटले आहे. नौदलामधील पायलट विजय वर्मा आणि नौदलाच्या सर्वच जवानांच्या कार्याला धन्यवाद म्हणण्यासाठी जबेल कुटुंबाने त्यांच्या घराच्या गच्चीवर पांढऱ्या रंगाने Thanks असा एका शब्दाचा संदेश लिहीला आहे. अलवा येथून ज्या घराच्या गच्चीवरून सुजीता आणि आणखीन एका महिलेला एअरलिफ्ट करण्यात आले त्याच गच्चीवर हा संदेश लिहीण्यात आला आहे. सध्या इंटरनेटवर हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या घराचे हॅलिकॉप्टरमधून काढलेले फोटो भारतीय नौदलाच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेयसीला मिळविण्यासाठी मुसलमान तरुण हिंदू बनला, पोहोचला सुप्रीम कोर्टात