Dharma Sangrah

भाई साठी मांजरेकर जाणार राज यांच्या कडे : राज आमचा खरा राजा - मांजरेकर

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:33 IST)
मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणे म्हणजे मोठा संघर्ष आहे. कोणताही सिनेमाग्रह मालक लवकर हे सिनेमे लावत नाही त्यामुळे अनेकदा संघर्ष उभा राहतो, आता असाच संघर्ष महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘भाई : व्यक्ती की वल्ली’हा चित्रपट उद्या म्हणजेच ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तेव्हा पुन्हा एकदा चित्रपटाला मुंबई-पुण्याच्या सिंगल स्क्रिन थिएटर मालकांनी स्क्रिनिंग देण्यास नकार दिला असून, त्यामुळे संतप्त झालेले दिग्दर्शक महेश मांजरेकर खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्रिनिंग मिळत नाही. ही एक लाजिरवाणी बाब आहे.महाराष्ट्रीन असल्याची लाज वाटते असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले आहेत.  त्याचबरोबर राज ठाकरेच आमचा खरा राजा असल्याचे मांजरेकर यावेळी म्हणाले आहेत.
 
राज यांच्या कडे जाणार मांजरेकर 
 
‘भाई : व्यक्ती की वल्ली’या चित्रपटाला स्क्रिनिंग न मिळण्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर मांजरेकर म्हणाले की, खरतर मला खळखट्याक करायची इच्छा नव्हती.मात्र राज ठाकरे आमचा खरा राजा आहे. तोच आमच्यासाठी खर्या अर्थाने लढत असून, त्यातून मार्ग निघेल असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर या विषयी आपण महाराष्ट्राचे सासंस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या विषयी चर्चा केल्या असल्याचेही मांजरेकर यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळून २३ जणांचा मृत्यू

मंत्री नरहरी झिरवाल यांचा 'आक्षेपार्ह' व्हिडिओ व्हायरल, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा गदारोळ

LIVE: मंत्री नरहरी झिरवाल यांच्या कथित व्हायरल व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

एफआयआर दाखल करण्याचा कर्नाटक पोलिसांना अधिकार नाही, अजित पवार प्रकरणात फडणवीस यांचे विधान

LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

पुढील लेख
Show comments