suvichar

वारकरी वर्गाला त्रास नको मराठा क्रांती मोर्चा, बंद बुधवारी

Webdunia
मंगळवार, 24 जुलै 2018 (09:24 IST)
मराठा आरक्षणाबाबत साठी सुरु असलेल्या आंदोलनात आज काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेल्याने सरकारच्या निषेधार्थ बुधवारी मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात येण्याची शक्यता आहे. आजच्या आषाढी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपुरात असलेले वारकरी उद्या परतीच्या वाटेवर असणार आहेत, त्यामुळे मंगळवार ऐवजी कदाचित बुधवारी महाराष्ट्र बंद असेल असे समन्वय समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बाबतचे वृत्त दैनिक लोकसत्ता ने दिले आहे. तर काकासाहेव यांच्या मृत्यूने मोठ्या प्रमाणात राजकीय टीका सुरु झाली आहे. औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करत आंदोलन आणखी तीव्र केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भूमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे. त्यामुळे पेच अधिक वाढला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात अशांतता निर्माण तर होणार नाही ना यावर सरकार विचार करत असून लवकरच निर्णय घेणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

मुंबईत मेट्रो आणि मोनोसोबत पॉड टॅक्सी धावणार,मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले

बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी अश्रू पुसताना दिसला! व्हिडिओ व्हायरल

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घ्या

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

पुढील लेख
Show comments