फिलाडेल्फिया- जगभरात आपल्याला प्राण्यांवर प्रेम करणारे लोकं सापडतील तसेच प्राण्यांचे डॉक्टर्सदेखील त्यांचा जीवन वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात फिलाडेल्फियातील प्राणी संग्रहालयात फ्रान्स्वा लंगूर प्रजातीच्या माकडानं पहिल्यांदाच जन्म घेतला आहे.
जू मध्ये जन्माला आलेलं या प्रजातीचं हे पहिलंच माकड आहे. संपूर्ण काळ्या रंगाची आणि काळ्या तोंडावर कडेला पांढरे कल्ले असलेल्या माकडंचं पिल्लू सर्वांचा लक्ष वेधत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या माकडाच्या पिल्लाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात पिल्लाला लहान बाळाप्रमाणे आंघोळ घालून ड्रायरने सुकवत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर त्याला एका सीरिनमधून भरवण्यातही आलं.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, Quy Bau असं या पिल्लाचं नाव आहे. François langur नावाच्या जातीची ही माकडं आता दुर्मीळ प्रजातीत असून आग्नेय आशिया हे या प्रजातीच्या माकडांच्या वस्तीचं ठिकाण आहे. तिथे जेमतेम 500 माकडं अस्तित्वात आहे.