Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वामी विवेकानंद प्रेरक प्रसंग: आपला मुक्काम निवडा

स्वामी विवेकानंद प्रेरक प्रसंग: आपला मुक्काम निवडा
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (09:10 IST)
एकदा स्वामी विवेकानन्द यांच्या आश्रमात एक व्यक्ती आली जी फार दु:खी जाणवत होती. ती व्यक्ती आल्याक्षणी स्वामींच्या पायात पडून म्हणे मी जीवनामुळे खूप दु:खी आहे आणि आपल्या दैनिक जीवनात खूप मेहनत करतो, मन लावून काम करतो तरी यश हाती लागत नाहीये. देवाने मला असे नशीब का बरं दिले. मी शिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी आणि धनवान होऊ शकत नाहीये.

स्वामी त्याची समस्या क्षणात समजले. तेव्हा त्यांच्याकडे एक लहानसा पाळीव कुत्रा होता, त्यांनी त्या व्यक्तीस सांगितले की आपण या कुत्र्याला फिरवून आणा नंतर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर 
देतो.
 
त्या मनुष्याने हैराण होऊन स्वामींकडे बघितले आणि कुत्र्याला घेऊन काही दूर निघाला. खूप वेळाने कुत्र्याला फिरवून तो परत आला तेव्हा स्वामींजी बघितले की त्या माणासाच्या चेहर्‍यावर चमक 
होती परंतू कुत्र्याला धाप लागली होती आणि थकलेला जाणवत होता. स्वामीजींनी विचारले की कुत्रा इतका कसा काय थकला जेव्हाकी आपण तर स्वच्छ आणि ताजेतवाने वाटत आहात.

माणूस म्हणाला, “मी तर आपल्या रस्त्यावर सरळ चालत होतो परंतू हा कुत्रा गल्लीतल्या सर्व कुत्र्यांमागे पळत होता आणि भांडून पुन्हा माझ्याकडे येत होता. आम्ही दोघांनी सारखाच रस्ता धरला होता परंतू कुत्र्याने अधिक धावपळ केल्यामुळे तो थकून गेला.”
 
स्वामींनी स्मित हास्य केले आणि म्हटले की “हेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे, आपला मुक्कम आपल्या जवळपास असून आपण तेथे पोहचण्याऐवजी इकडे-तिकडे पळत राहतो आणि 
मुक्कामपासून दूर होत जातो.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिसर्‍या तिमाहीत एअरटेलचा 854 कोटी रुपयांचा नफा झाला