Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपळगाव बसवंतचे हेरिटेज ट्री ‘गुगल मॅप’वर; पुरातन वृक्षांची डिजिटल नोंद घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (22:03 IST)
मागील वर्षी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये नाशिक येथील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने पर्यावरण पूरक अनेक योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता, याही वर्षी माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीने सहभाग घेतला असून ग्रामपंचायत हद्दीतील हेरिटेज ट्रीज (पुरातन वृक्ष)ची गणना पुर्ण केली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे या वृक्षांची नोंद ही ‘गुगल मॅप्स’वर करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
 
नाशिकच्या निफाड तालुक्यातील असलेली पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत असून त्यांनी “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण केली आहे. गावाच्या एकुण क्षेत्रफळात 16,500 वृक्षांचा समावेश असून त्यापैकी 480 वृक्ष हे पुरातन “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) आढळून आले आहेत. यात सगळ्यात जुने 220 वर्षांपूर्वीचे एक वडाचे झाड आढळले असून बाकी वृक्षांचे आयुर्मान देखील 100 ते 150 वर्ष इतके आहे. तसेच ही वृक्ष गणना पूर्ण करून गुगल मॅप्स वर प्रकाशित करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने वृक्षांचे छायाचित्रासह नाव आणि माहिती गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या फेसबुक पेजवर हेरिटेज वृक्षांच्या नोंदीची दखल घेण्यात आली असून पर्यावरण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा म्हैसेकर यांनी याबद्दल फेसबुकवर कौतुक केले आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती अलका (आक्का) अशोकराव बनकर, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांनी यासाठी प्रयत्न केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments