मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये मारा मार्टीन या मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक केला आहे. तिने तिच्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन मिआमी स्वीम विक २०१८ च्या रॅम्पवर वॉक केला आहे. तिच्या या धाडसा वरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मिआमीमध्ये सध्या स्वीमवेअरचा फेस्टिव्हलमध्ये एक स्पर्धा असून यात सर्वात सुंदर स्विमवेअर असलेल्या कंपनीला व मॉडेलला विजयी घोषित केले जाते. या स्पर्धेत मारा पहिल्या १२ जणींमध्ये निवडली गेली होती. अंतिम फेरित माराने सोनेरी रंगाची वन शोल्डर बिकीनी घातली होती. मात्र रॅम्पवर येण्याआधी तीने आपल्या बाळाला छातीशी कवटाळून स्तनपान करायला सुरुवात केली व तशीच ती रॅम्पवर देखील गेली. तिला रॅम्पवर स्तनपान करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले मात्र नंतर लोकांनी तिच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.