Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींचे भाषण रद्द होवू नये म्हणून वाजपेयी यांच्या मृत्यू घोषणा दुसऱ्या दिवशी

Webdunia
सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (17:29 IST)
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू १६ ऑगस्टला झाला ? की त्यांच्या मृत्यूची घोषणा १६ ऑगस्टला केली ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून स्वराज्य म्हणजे काय असे विचारले आहे. तुम्ही स्वराज्य ज्याला म्हणतात ते खरच आहे का ? असा प्रश्न त्यांनी त्यांचा सामनातील सदर रोखठोक मध्ये विचारले आहे. मात्र राऊत यांच्या टीका वजा रोखीने अनेक प्रश्न निर्माण केले असून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. वाचा राऊत काय म्हणत आहेत 
 
स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा झाला. स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झाली, पण ‘स्वराज्य’ आले काय? 72 वर्षांत लाल किल्ल्यावरून फक्त घोषणाच झाल्या. ‘स्वराज्या’ची व्याख्या स्वातंत्र्यापूर्वी ‘काँगेस’ने केली. मोदी तीच व्याख्या पुढे नेत आहेत!
 
“स्वराज्य’ म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले, पण साधारण 12-13 ऑगस्टपासून त्यांचा श्वास मंद होऊ लागला. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको व लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, पंतप्रधानांचे सविस्तर भाषणही लाल किल्ल्यावरून व्हायचे होते या राष्ट्रीय विचाराने अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली). याला म्हणतात स्वातंत्र्य. वाजपेयींच्या शोकसभेत डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी ‘भारतमातेचा जय’ अशा घोषणा दिल्या, ‘जय हिंद’चे नारे दिले म्हणून डॉ. अब्दुल्लांना श्रीनगरात धक्काबुक्की केली व सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले. हेसुद्धा नवे स्वातंत्र्य उदयास आले आहे.
 
दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी घुसलेले अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यश आले की समजावे, स्वातंत्र्य दिन जवळ येऊन ठेपला आहे. या वेळीही परंपरेप्रमाणे हे घडले. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उधळून लावण्यासाठी दिल्लीत घुसलेल्या 10 अतिरेक्यांना अटक झाली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा पकडला गेला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बेडरपणे स्वातंत्र्य दिन साजरा केला. सध्या देशभरात सर्वत्र बंद, जाळपोळी सुरू आहेत. त्यात देशाची घटना जाळण्याचा प्रकार दिल्लीत घडला. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर संविधान जाळणाऱयांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे एव्हाना जाहीर झाले असते, पण ज्यांनी दिल्लीत अतिरेकी पकडल्याचा बनाव केला त्यांच्या डोळय़ांसमोर डॉ. आंबेडकरांचे संविधान जाळले गेले. देशाचे स्वातंत्र्य कोणत्या वळणावर आहे याचे हे उदाहरण. सबंध जगात हिंदुस्थान हा एकमेव देश असावा की, जेथे कोणतेही काम करणे माणसाला मुश्कील व्हावे.
 
नेमके काय?
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण केले. गोरगरीबांसाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या. आधीच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे स्वातंत्र्य वाया गेले असा त्यांच्या भाषणाचा रोख होता. स्वातंत्र्याची व्याख्या जो तो आपापल्या सोयीप्रमाणे करतो. हिंदुस्थानची जनता ‘स्वातंत्र्य’ देण्याच्या लायकीची नाही. ते स्वातंत्र्य विकून खातील असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी तेव्हा केले होते. ‘चर्चिल’ खरे होते हे सिद्ध करण्याची स्पर्धाच गेल्या 70 वर्षांत झाली. स्वातंत्र्य आणि स्वराज्य म्हणजे नेमके काय, स्वराज्याची व्याख्या काय याबाबत स्वातंत्र्यपर्वात जितका गोंधळ नव्हता त्यापेक्षा जास्त आज आहे. बॅ. नाथ पै यांनी त्यांच्या भाषणांतून अनेकदा स्वराज्याची व्याख्या केली. ती व्याख्या खरी मानली तर आज आपल्याला त्या स्वराज्याचा लाभ खरोखरच झाला आहे काय, असा प्रश्न पडतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवीमुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

पंतप्रधान मोदींवरील पुस्तकाच्या प्रचारासाठी स्मृती इराणी चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या

कोल्हापुरात शाळेचे गेट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

LIVE: शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एमव्हीएमध्ये गदारोळ, महायुतीतून हे नाव पुढे आले

पुढील लेख
Show comments