Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा
, शनिवार, 21 एप्रिल 2018 (09:37 IST)
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात या व्यक्तीला लहान मुलांसोबत लैगिंग अत्याचार करणे आणि त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्न साईटला विकणे असे गंभीर आरोप होते. अमेरिकामधील नॅशव्हिलेमध्ये ही घटना घडली असून जराट टर्नर असे आरोपीचे नाव आहे. त्यामुळे पालकवर्गाला मोठा धक्का बसला आहे. 
 
हा आरोपी जराट टर्नर रुग्णालयात साफसफाईचे काम करत होता. हा टर्नर  स्पायडर मॅनचे रुप घेऊन मुलांसोबत अश्लिल चाळे करत होता. तसे करत असतांना त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्नसाईडला विकत होता. या आरोपात तो दोषी ठरला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, जराट टर्नर स्पायडर मॅन बनून लहान मुलांसोबत अश्लिल व्हिडीओ तयार केले होते. हे सर्व व्हिडीओ ऑनलाईन विकले होते. कोर्टाने या प्रकरणात त्याला दोषी ठरवत 105 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 105 वर्षांच्या तुरुगंवासासह पीडित मुलांना 31 हजर डॉलर म्हणजे 20 लाख रुपयाचा जुर्माना देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. विशेष म्हणजे स्पायडर मॅनची कपडे घालून रुग्णालयाची सफाई केल्यामुळं 2014 मध्ये जराट टर्नर प्रथमच प्रकाशझोतात आला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी