Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पृथ्वीवरचा नरक- हेल

पृथ्वीवरचा नरक- हेल
पुण्यवान माणूस मरणानंतर स्वर्गात जातो, पापी नरकात जातो असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पर्यटनासाठी जाणारे प्रवासी अनेकदा एखाद्या सुंदर स्थळाचे वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असे करतात. 
 
मात्र स्वर्ग असले तर नरक असणारच. अमेरिकेच्या मिशिगन राज्यात एक अशी जागा आहे ज्याला पृथ्वीवरील नरक असे नाव आहे. होय, या गावाचे नावच हेल म्हणजे नरक असे आहे. अर्थात इथेही लोक राहतात. या शहरात वर्षातले सात महिने हिमपात होतो. त्यामुळे अनेकदा नागरिकांना घरातच बंदिवान होऊन राहावे लागते.
 
काही महिन्यांपूर्वी आलेल्या हर्ब्युलास वादळामुळे हे गाव चर्चेत आले होते. त्यावेळी या शहराचे तापमान उणे 13 डिग्री होते. सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडू नये अशा सूचना हवामान विभागाने दिल्या होत्या. या गावाच्या नावाविषयी अनेक कथा आहेत. 
 
एकदा दोन जर्मन माणसे येथे आली तेव्हा सुंदर ऊन पडले होते ते पाहून एकाने सो स्कोन हेल असे उद्‌गार काढले. याचा अर्थ होता किती सुखद ऊन. पण ऐकणार्‍याने फक्त हेल ऐकले आणि तेव्हापासून गावाचे नाव हेल पडले. दुसरी कथा अशी की जेव्हा मिशिगनला राज्याचा दर्जा मिळाला तेव्हा जॉर्ज रिव्हज यांना या गावाचे नाव काय ठेवावे असे विचारले गेले. 
 
तेव्हा येथे डास, दाट जंगल, दलदल अशी अत्यंत वाईट परिस्थिती होती. जॉर्ज यांनी गावाचे नाव काहीही ठेवले तरी काय फरक पडणार अगदी हेल ठेवले तरी चालेल असे म्हटल्यावर खरोखरच गावाचे नाव हेल झाले. 
 
अमेरिकन पोस्ट विभाग हेल नावाच्या गावाला ओळखत नाही ते या गावाला पिकाने या नावाने ओळखतात. म्हणजे या गावाचा समावेश पोस्ट पिकाने या पोस्ट हद्दीत केला गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट