Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय झाडी, काय डोंगार,लैच ओके हाय..., सॉंग व्हायरल !

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (13:04 IST)
फोटो साभार - सोशल मीडिया सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे . राज्याच्या राजकीय वातावरणात उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या तब्बल ५० आमदारांनी माविआ सरकारच्या विरोधात बंड  पुकारला आहे. विधानपरिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे हे नॉट  रिचेबल झाले. सध्या एकनाथ शिंदे गट आसामच्या गुवाहाटी येथे आहे. सध्या एकनाथ शिंदेंच्या गटातील एका नेत्याची फोनवरची रिकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील शहाजी पाटील हे फोन वर गुवाहाटीच्या निसर्गाचं आणि हॉटेलचं कौतुक करत आहे. त्यांच्या फोनवरील या रिकॉर्डिंगवरून हिंगोलीच्या एका तरुणाने शहाजी पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर, लईच ओके' या वाक्यावर चक्क गाणं तयार केले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shantanu Pole  (@shantanu_pole_7)

शंतनू पोळे असे या तरुणाचं नाव असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. शंतनू पोळे या तरुणानं हे गंमतीशीर गाणं बनवलं आहे. सोशल मीडियारील ट्रेंडवर गाणं बनवणाऱ्या यशराज मुखाते यांच्याकडून प्रेरणा घेत हे गाणं बनवल्याचं शंतनू पोळे याने आपल्या इंन्स्टाग्रान पोस्टमध्ये म्हटलं आहे. यशराज मुखाते यांचे 'रसोडे में  कौन था ?'हे गाणं प्रचंड व्हायरल झाले. तसेच "या राजकारण्यांच राजकारण तर चालत राहील, आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, हाय का नाय!" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.युजर्स ने त्याच्या गाण्याला पसंती दिली आहे. युजर्स त्यावर आपापली प्रतिक्रिया देत आहे. 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments