Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोण आहेत समीर वानखेडे? आजपर्यंत या सेलिब्रेटींना पाठवले आहे त्यांनी जेलमध्ये

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:12 IST)
बॉलीवूड सिनेमात पोलिस अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज मोहिमेविषयी अनेक चित्रपट निघाले आहेत.  प्रत्यक्षातही पोलिस खात्यामध्ये असे अनेक कर्तृत्ववान अधिकारी असतात. त्यापैकी सध्या एक नाव गाजत आहे, ते म्हणजे समीर वानखेडे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे ते झोनल डायरेक्टर आहेत. रिया चक्रवर्तीपासून ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंतच्या प्रकरणात आपण वानखेडे यांचे नाव ऐकले असेल. मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे नक्की कोण आहेत? त्यांची आजवरची कारकीर्द नक्की कशी आहे ते आपण आता जाणून घेऊया…
 
समीर वानखेडे यांचा जन्म 14 डिसेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. मराठी कुटुंबात जन्मलेले समीर यांचे वडील दयदेव वानखेडे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. तर आई जेहदा वानखेडे गृहिणी आहेत. समीर यांची बहीण यास्मीन वानखेडे व्यवसायाने वकील आहे.
 
समीर यांनी 2008 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. भारतीय महसूल सेवेत त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईत झाली. याशिवाय, त्यांनी इन्कम टॅक्स एअर इंटेलिजन्स युनिट, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 42 वर्षीय समीर यांनी बी.ए. हिस्ट्री ऑनर्सचा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्र सेवा कर विभागात काम करत असताना, 2010 मध्ये समीर वानखडे यांनी 2500 जणांवर कर चुकवेगिरी बद्दल कारवाई केली होती. यामध्ये 200 हून अधिक बॉलिवूडमधील दिग्गजांचा सहभाग होता. तसेच अनेक मोठी राजकीय व्यक्तिमत्वे होती. त्यावेळी महाराष्ट्र सेवा करांमध्ये 87 कोटी रुपयांची भर पडली.

मुंबई विमानतळ विभागात ड्युटीवर तैनात असताना समीर यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा सोन्याने मडवलेला विश्वचषक घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्यालाही समीरने सीमा शुल्क आकारले. तसेच कस्टम ड्युटी मिळाल्यानंतर त्या संघाची सुटका करण्यात आली.
परदेशी चलनांसह प्रवास करणारे प्रसिद्ध गायक मिका सिंग यांना 2013 वानखेडे यांनी विमानतळावर थांबवले. बराच वेळ चौकशी केली आणि एक लाख रुपयांच्या जामिनावर सिंग यांची सुटका केली. एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केल्यानंतर समीरने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन युनिटमध्ये एसपी म्हणून काम केले. यानंतर त्यांना महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) सहआयुक्त करण्यात आले.

समीर वानखेडे यांनी 29 मार्च 2017 रोजी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्न केले. क्रांतीने प्रकाश झाच्या गंगाजल सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने 22 मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून किंवा चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. समीर आणि क्रांतीच्या दोन मुली झैदा आणि जिया आहेत.
2019 मध्ये समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर करण्यात आले. यानंतर त्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकून 1700 कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मा यांसारखी मोठी नावेही यात समाविष्ट होती.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग प्रकरण पुन्हा समोर आले. यानंतर समीर वानखेडे यांनी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतले, ती सुशांतची गर्लफ्रेंड होती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती ही दोषी होता, म्हणून दोघांनाही एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले.

नोव्हेंबर 2020 मध्ये ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक केली होती. याच वर्षी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांवर ड्रग्ज विक्रेत्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन अधिकारी गंभीर जखमी झाले.

आता सुमारे तीन पुन्हा आठवड्यापासून ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने मुंबईतील क्रूझवर छापा टाकला. यामध्ये ड्रग्ज पार्टी करताना अनेक जण पकडले गेले. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही सहभाग होता. आता या प्रकरणात अभिनेता चंकी पांडे यांची कन्या तथा अभिनेत्री अनन्या पांडे हिची सुद्धा चौकशी सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments