Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WHO गाइडलाइन: स्वयंपाक करण्याचे नियम

webdunia
सोमवार, 18 मे 2020 (15:32 IST)
आता WHO ने कोरोनाच्या संसर्गाच्या दरम्यान स्वयंपाक करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना सांगितल्या आहेत. असे प्रथमच झाले आहे की WHO ने अन्नाच्या संदर्भात काही नियमावली दिल्या आहेत. या मध्ये अन्नाविषयी सावधगिरी बाळगणे तसेच खाण्यापिण्याच्या संदर्भात अनेक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
 
WHO ने म्हटले आहे की कोरोनाच्या संसर्गा पासून वाचण्यासाठी लोकांनी स्वच्छते बाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहेत. कोणत्याही खाद्यपदार्थाला स्पर्श करण्या तसेच खाण्यापूर्वी आपले हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे. 
 
स्वयंपाकघरातील ओटा किंवा कट्टा दर रोज स्वच्छ करावा. जेणे करून स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकाराचे कीटक आणि उंदीर येता कामा नये. 
स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकिन व इतर कपडे देखील स्वच्छ ठेवायला हवे. 
हानिकारक जिवाणू या कापड्यांवर, भांडे ठेवण्याच्या जागी आणि भाजी चिरण्याच्या बोर्डावर चिटकून राहतात. या जागेची पण दररोज स्वच्छता करायला हवी.
शिजवलेल्या अन्न कच्च्या पदार्थांपासून लांब ठेवायला हवं. विशेषतः मासे, मीट सारख्या पदार्थांना थेट दुसऱ्या वस्तूंच्या संपर्कात येऊ देउ नये.
एका प्रकारांच्या खाद्य पदार्थ चिरल्यावर सूरी आणि कटिंग बोर्डला स्वच्छ करून घ्यावे. 
कच्च्या आणि शिजवलेले अन्न वेगवेगळ्या भांड्यात ठेवावे. दोन्ही भांडे संपर्कात तर नाही याची खात्री करून घ्यावी.
कच्चे अन्न जसे मीट, मासे, रस या पदार्थांमध्ये देखील जिवाणू असू शकतात. जे शिजवलेल्या अन्नात मिसळून त्याला देखील खराब करू शकतात. हे अन्न एका स्वस्थ माणसाने खाल्यावर तो सहजच आजारी पडू शकतो. 
कोणत्याही अन्नाला व्यवस्थित शिजवून घावे. ज्या अन्नाला शिजायला वेळ लागतो जसे की मीट, मासे, अंडी अशे पदार्थांना मंद आंचेवर शिजत पडू द्या. असे केल्याने त्यांच्या मधील असलेले सर्व जिवाणू नष्ट होतील. 
शिजवलेले अन्न खाण्याच्या आधी व्यवस्थित गरम करायला हवं.
शिजवलेल्या अन्नाला जास्त वेळ बाहेर राहू देऊ नये. जर अन्न पूर्ण संपत नसेल तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. आणि परत खाण्याच्या आधी ते गरम करूनच घ्या. शिजवलेल्या अन्नाला 2 तासांहून जास्त वेळ मोकळ्या हवेत सोडू नये.
अन्न शिजवताना वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 
शक्य असल्यास स्वयंपाकासाठी देखील RO पाण्याचा वापर करावा. 
कोणतीही भाजी शिजवण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ताज्या भाज्यांना प्राधान्य द्या.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

लॉकडाउन नंतर बरेच काही बदलेल, 70% भारतीय सार्वजनिक वाहतूक टाळतील: सर्वेक्षण