rashifal-2026

हे बघा जगातील सर्वात तरुण आजीबाई

Webdunia
गुरूवार, 24 मे 2018 (12:02 IST)
सध्या एका सुंदर आजीबाईंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या एका फोटोमुळे या आजीबाई इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की इन्स्टाग्रामवर त्यांचे ७४ हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. जीना स्टुअर्ट (४७) असे तिचे नाव असून ती जगातील सर्वात तरुण आजी आहे.
 
जीनाला २ मुलगे व २ मुली आहेत. यातील दोघांचे लग्न झाले असून त्यांना मुलंही आहेत.पण जीनाकडे बघून मात्र यावर विश्वास ठेवणं कठीणं आहे. फिटनेस अलर्ट असलेली जीना मिस ऑस्ट्रेलिया स्पर्धेत भाग घेण्याची तयारी करत आहे. या स्पर्धेत तिची टक्कर १८ वर्षांच्या मुलींबरोबर आहे. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत कधीही कसलीही कॉस्मेटिक सर्जरी केलेली नाही. तिचं हे सौंदर्य नैसर्गिक आहे.
 
तिच्या या तारुण्याचं कुतूहल अनेकजणांना आहे. यावर ती म्हणते की मी कधीही सौंदर्य वाढवण्यासाठी रासायनिक कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केलेला नाही. केसांना मी नारळाचे तेल वापरते. झीरो कॅलरीयुक्त चॉकलेट्स खाते. चेहऱ्यावर सेंद्रीय मॉयश्चरायझर लावते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत म्हणून मी गुलाब तेलाचाही वापर करते. पनीर बटर व न्यूटेलाही ती खाते. त्याचबरोबर नियमित व्यायाम व डाएट हीच तिच्या सौंदर्यांची गुपितं आहेत.
 
दरम्यान, जर जीना जिंकली तर मिस ऑस्ट्रेलिया स्पर्धेत तिला १० हजार डॉलर बक्षिस म्हणून मिळणार आहेत. पण हे सर्व पैसे ती तिच्या आजारी मित्राला दान म्हणून देणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

LIVE: भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी डीपीसीची मान्यता

युक्रेनने 91 ड्रोनने पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याचा रशियाचा दावा

शिवसेना युबीटीने काँग्रेसशी हातमिळवणी केली, जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

पुढील लेख
Show comments