Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर: मुंडे, गडकरी, गोयल, मोहोळ यांना उमेदवारी

pankaja munde
, गुरूवार, 14 मार्च 2024 (11:05 IST)
भारतीय जनता पार्टीने लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत तसेच काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
नागपूरमधून नितीन गडकरींना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
 
या यादीमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना संधी मिळाली आहे.
नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगांवमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारेे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.
कर्नाटकात चिकोडीमधून अण्णासाहेब जोल्ले, विजापूरमधून रमेश जिगजिनगी, गुलबर्ग्यातून उमेश जाधव यांना संधी मिळाली आहे. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिकीट देण्यात आले आहे. धारवाडमधून प्रल्हाद जोशी तर म्हैसूरमधून यदुवीर वाडियार यांना संधी मिळाली आहे.
 
बंगळुरू उत्तरमधून शोभा करदलांजे यांना बंगळुरू दक्षिणमधून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकातील 26 जागांची यादी यामध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूरमधून अनुराग ठाकूर, शिमल्यातून सुरेश कश्यप यांना संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेलीतून तिकीट देण्यात आले आहे
 
Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव आयपीएल 2024 पूर्वी बदलणार!