Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुस्लिमला तिकीट दिले नाही म्हणून गोंधळ, राजीनामा दिल्यानंतर प्रश्न विचारत आहे काँग्रेस नेता- काय बोलले खरगे

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (16:28 IST)
राजीनामा दिल्या नंतर मुहम्मद आरिफ खान म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी 48 लोकसभा जागांवर निवडणूक लढवत आहे, पण अल्पसंख्यांक समाजातील एक देखील उमेद्वाराला तिकीट दिले नाही. 
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने लोकसभा निवडणूक मध्ये मुस्लिम उमेद्वार उतरला नसल्याने गोधळ निर्माण झाला आहे. याला घेऊन काँग्रेस नेता मोहम्मद आरिफ खान ने पार्टीच्या अभियान समितीमधून राजीनामा दिला. यानंतर ते म्हणाले की, 'पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाशी मिळून मी या बद्दल सांगेल. तुम्हाला माहित आहे की, काँग्रेस पार्टीची नीती आणि विचारधारा एक राहिली आहे. लोकसंख्यानुसार लोकांना प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी दिली जावी आणि मग सरकार बनली तर योजनांमध्ये समाजातील प्रत्येक वर्गाची भागीदारी असावी. 
 
मुहम्मद आरिफ नसीम खान म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 48 लोकसभा जागांसाठी निवडणूक लढवीत आहे. पण, अल्पसंख्यांकांना एक देखील तिकीट दिले नाही. यामुळे लोक दुखी झाले आहे. व मला प्रश्न विचारत आहे. काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजातील एका पण व्यक्तीला उमेदवार का नाही बनवले. मला जाणून घ्यायचे आहे की अशी काय मजबूरी आहे. 
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. मग ते म्हणाले की तिथे तीन पार्टीची आघाडी आहे. तिघे पार्टी मिळून निर्णय घेतात. काही गैरसमज देखील होतात. खरगे म्हणाले की, 'त्यांना राज्यसभा आणि विधानसभा जागांमध्ये कंपनसेट केले जाईल. आमच्याकडून कोणतीही समस्या नाही. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या 8 जागांसाठी 56.42 प्रतिशत मतदान झाले. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

पुढील लेख
Show comments