Marathi Biodata Maker

गडकरी उघडपणे आचारसंहिता भंग करत आहेत, भाजपची तक्रार घेऊन काँग्रेस निवडणूक आयोगात पोहोचली

Webdunia
गुरूवार, 4 एप्रिल 2024 (13:16 IST)
2024 च्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान काँग्रेसने गडकरी आणि भाजपविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भाजप आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने राजकीय प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असा आदेश जारी केला होता.
 
निवडणुकीशी संबंधित कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेण्याच्या बंदीबाबत निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना असूनही भाजप आणि गडकरी आपल्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी शाळकरी मुलांचा वापर करत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विरोधी पक्षाने गडकरी आणि भाजपवर "तात्काळ आणि निर्णायक कारवाई" करण्याची मागणी केली आहे.
 
काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की NSVM फुलवारी शाळेतील विद्यार्थ्यांचा वापर भाजप आणि त्यांच्या उमेदवाराने 1 एप्रिल रोजी नागपुरातील निवडणूक रॅलीसाठी केला होता. काँग्रेसने आपले आरोप सिद्ध करण्यासाठी व्हिडिओ आणि छायाचित्रेही आयोगाला सादर केली आहेत.
 
नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार ठाकरे यांची थेट स्पर्धा भाजपचे ज्येष्ठ नेते गडकरी यांच्याशी आहे. अलीकडेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले होते की, मला आपल्या विजयाचा 101 टक्के विश्वास आहे. 5 लाखांहून अधिक फरकाने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गडकरी सध्या लोकसभेत नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
 
19 एप्रिलला मतदान आणि 4 जूनला निकाल
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments