Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळणार

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2024 (10:03 IST)
अनेक दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे.   आता महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जनाकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कारण शरद पवार यांच्या वाट्याला आलेल्या 9 जागांची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये माढा या मतदारसंघाचा समावेश आहे. माढ्यासह बारामती, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचे म्हटले जात आहे.
 
शरद पवार माढ्यातून जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनीदेखील हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी भाजपाचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती. दुसरीकडे भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथे जानकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

भाजप आमदार ट्रेनसमोर रुळावर पडल्या, व्हिडिओ व्हायरल

या 33 नावांपैकी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा

न्यूयार्कच्या स्वामी नारायण मंदिरात तोडफोड, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ठाण्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये टेरेसवर शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला

पुढील लेख
Show comments