Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (09:51 IST)
शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांनी  दिली.
 
आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक झाली. यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नावाची लवकर घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आज वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व येथील कार्यलयात त्यांनी उत्तर पश्चिम मतदार संघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि माजी नगरसेवकांची बैठक घेवून मतदार संघाची चाचपणी केली होती. चर्चेदरम्यान ते त्यांच्या उमेदवारी बद्धल बऱ्यापैकी सकारात्मक होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
वर्षावर 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उत्तर पश्चिम मधील शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि 17 माजी नगरसेवकांची मध्यरात्री बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वांनी वायकर यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुण मंचावर चढला, तरुणाला ताब्यात घेतले

अरविंद केजरीवाल दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

चेंबूर मध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर ऑटो रिक्षा चालकाकडून लैंगिक अत्याचार

गोंदियाच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments