Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Webdunia
मंगळवार, 23 एप्रिल 2024 (20:43 IST)
ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गट त्यांच्याविरोधात गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रविंद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. या आधी या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा झाली होती.
 
मनसेचा ठाकरे गटाला इशारा
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता मनसेमहायुतीसोबत प्रचार, बैठका यांवर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे कुठे प्रचारसभा घेणार, मनसैनिक महायुतीच्या प्रचारात कसे सहभागी होणार, याची रणनीती आखली जात आहे. अशातच ठाकरे गटाने केलेल्या टीकेवरून आता मनसेने थेट शब्दांत इशारा दिला आहे.
 
राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी फटाके आहेत. त्यामुळे कोकणात काहीही फरक पडणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती. या टीकेला मनसेकडून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत राऊतांसह ठाकरे गटाला इशारा दिला असून, राज ठाकरे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments