Festival Posters

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

Webdunia
सोमवार, 13 मे 2024 (18:40 IST)
लोकसभा निवडूणुकीत बारामती जागेसाठी चुरशीची लढत आहे. यंदा पवार vs सुळे अशी लढत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे  यांनी ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून त्यांनी ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे 45 मिनिटे बंद राहिल्याचा आरोप केला आहे. या मागे कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 

बारामती यंदाच्या निवडणुकीत हॉट सीट बनली असून या ठिकाणी शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी एक व्हिडीओ शेअर केला असून आरोप केला आहे की ज्या इव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते कॅमेरे 45 मिनिटासाठी बंद करण्यात आले असून ही घटना संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या मध्ये निवडणूक आयोगाची मोठी चूक असल्याचे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ज्या ठिकाणी महत्त्वाची वस्तू ठेवली आहे तिथला सीसीटीव्ही बंद असणे ही मोठी चूक आहे. निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय स्ट्रॉंग रूम मध्ये तंत्रज्ञ उपलब्ध नाही. 
 
दुसरी कडे बारामतीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामाला ईएसआय ने स्ट्रॉंग रूम बनवल्याचा आरोप शरद पवार गटातील नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात नाही आणि सकाळी 10:30 ते 11:15 वाजे पर्यंत ईव्हीएम रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही बंद का करण्यात आले या कडे ताबडतोब लक्ष द्यावे. आणि या साठी जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे म्हटले आहे. 
 
या वर प्रतिक्रिया देत निवडणूक अधिकारी म्हणाले, स्ट्रॉंग रूमच्या कॉम्प्लेक्स मध्ये काही विद्युतचे काम सुरु असताना कॅमेऱ्याची केबल काही काळासाठी काढण्यात आली असून बारामतीच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासणी करण्यात आल्यावर असे आढळून आले की वेअरहाऊस मध्ये इलेक्ट्रिशियन ने केबल काढल्यामुळे डिस्प्ले युनिट बंद झाले होते.   
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments