rashifal-2026

श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:20 IST)
कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार द्यावा अन्यथा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असं ठराव आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
 
ही बैठक आज रात्री उशिरा भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी त्यांचे समर्थक असलेले भाजप कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत झालेला ठराव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.  
 
या संदर्भात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात काय बैठक पार पडली याविषयी मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो मात्र मी या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी निवडणूक संदर्भातील बैठकीत उपस्थित होतो. गणपत गायकवाड यांच्या पाठीशी केवळ कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते नाहीत तर संपूर्ण भाजप आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडक्या बहिणींना 2100 कधी; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू

मेटा तुमचे खाजगी व्हॉट्सअॅप चॅट्स वाचू शकतो, त्यांचा गोपनीयतेचा दावा खोटा आहे का?

रस्ते अपघातातील बळींना ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार; मंत्री नितीन गडकरी

रक्ताने माखलेला भूतकाळ, तुरुंगात फुललेले प्रेम आणि आता लग्न...प्रिया सेठच्या गुन्ह्याची कहाणी

पुढील लेख
Show comments