rashifal-2026

सातारा लोकसभा: श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2024 (09:14 IST)
महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित होते. मात्र ऐनवेळी त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाकडून येथून राज्यसभा सदस्य उदयनाराजे भोसले यांचे नाव निश्चित मानले जात आहे. नुकतेच ते दिल्लीवारी करुन आले आहेत. महाविकास आघाडी जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. त्यांच्या विद्यमान खासदारांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांपुढेही पेच निर्माण झाला आहे. समोर उदयनराजेंसारखा तगडा उमेदवार असल्यामुळे तेवढाच तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे. त्यासाठी आज कराडमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली.
 
खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. तर दुसरं नावही तेवढचं महत्त्वाचं मानलं जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातऱ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Best Hatchback Cars in India 2025: २०२५ मध्ये या परवडणाऱ्या कारने लोकप्रियता मिळवली, सामान्य माणूस आणि उच्चभ्रू दोघांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या

टी-२० सामना रद्द झाल्यानंतर अखिलेश यादव यांच्या "चेहरा झाका" या वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले

केंद्र सरकारबद्दल संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, १९ डिसेंबर रोजी मोदी सरकार कोसळेल

प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट, जेवल्याशिवाय जाऊ नका असे आवाहन केले

वडिलांचा गळा दाबला, आईला करवतीने कापले... मुलाने हा रक्तरंजित खेळ का खेळला?

पुढील लेख
Show comments