rashifal-2026

महायुतीत राजकीय भूकंप होणार? हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:33 IST)
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
 
नाशिक लोकसभा जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत आहे. गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमधील तिढा कायम आहे. या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे आज मंगळवारी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
 
हेमंत गोडसे यांच्या १० पानी अहवालात काय लिहिलंय?
महायुतीकडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटन बांधणीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे यांच्या बंडाचा फटका नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बसू शकतो.
 
नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच भुजबळांच्या उमेदवारी महायुतीची १ जागा कमी होईल. अशा अनेक मुद्द्यांचा सामावेश अहवालात असल्याची माहिती हाती आली आहे. आता गोडसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते काय भूमिका घेतात,हे बघणं महत्वाचं ठरेल.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मतदार यादीत मोठा घोटाळा उघडकीस

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

अरे देवा! एकाच वडिलांची २६८ मुले? पनवेल मतदार यादीत मोठा घोटाळा; निवडणूक पारदर्शकतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित

अजब गावाची गजब परंपरा, वर सजला वधू प्रमाणे तर वधूने घातला वराचा पोशाख; यामागील रहस्य काय आहे?

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या दिवशी होऊ शकते

पुढील लेख
Show comments