Marathi Biodata Maker

पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा,राज्य सरकारचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 23 एप्रिल 2024 (22:57 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकार ने वाय प्लस दर्जेची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रसार आणि प्रचार जोरात सुरु आहे. राज्यात तापमानात वाढ झालेली असून सध्या उकाडा वाढत आहे. उन्हात देखील राजकीय मंडळी खेड्यात जाऊन लोकांना भेटत आहे. यंदा बारामती लोकसभा मतदार संघ हे अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि प्रातिष्ठेचं आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे.  

अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार देखील बारामती मतदार संघात जोमानं प्रचार करत आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. 
बारामती मतदार संघात पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. पार्थ आपल्या आईच्या सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत आहे. पार्थ बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ता आणि नागरिकांशी संवाद साधत आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments