Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अगं आई गं. मनेका-मायावतींची जुंपली

वार्ता
' आईचं दुःख कळून घ्यायला आईच व्हावं लागतं.' आणि 'आईचं दुःख समजून घ्यायला आई व्हायची काही गरज नाही' हे दोन एखाद्या सुमार मराठी कौटुंबिक चित्रपटातले 'कुबलछाप' डॉयलॉग वाटत असले तरी ते उच्चारणार्‍या अनुक्रमे मनेका गांधी व मायावती या दोन राजकारणी स्त्रिया आहेत.

वरूण गांधी यांना भेटण्याची परवानगी मनेका गांधी यांना नाकरण्यात आल्यानंतर मनेकांनी मायावतींवर 'एक आईच दुसर्‍या आईचं दुःख समजू शकते. मायावतींना तो अनुभव नाही, अशा शब्दात टीका केली होती. त्याला मायावतींनी, आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होणं गरजेचं नाही, असं उत्तर दिलंय.

मायावती म्हणाल्या, मनेका गांधींना केवळ आपल्या मुलाच्या दुःखाची काळजी आहे, मला तर पूर्ण देशातल्या लोकांची काळजी आहे. आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होण्याची गरज नाही. मदर टेरेसा याही आई झालेल्या नव्हत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मनेका यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे होते. तसे झाले असते तर आज वरूण तुरूंगात दिसला नसता, असा टोला लगावत, कायदे तोडणार्‍यांना क्षमा नाही. भलेही तो गांधी कुटुंबातला का असेना अशा शब्दांत मायावतींनी मनेका गांधी यांना फटकारले.

मनेका गांधी यांचे विधान लाजीरवाणे आहे. त्यांनी आपली व देशाची माफी मागितली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्‍यान, मायावतींच्‍या खुलाशाला मनेका यांनी पुन्‍हा टीकेनेच उत्तर दिले असून मायावती या जर स्‍वतःला मदर तेरेसा म्हणवत असतील तर त्या ही गोष्‍ट विसरताहेत की मदर तेरेसा यांनी कधीही हप्‍ता वसुली केली नाही किंवा त्यांनी कधी कुणाकडून ती करवूनही घेतली नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात या घरगुती लिप बामने तुमचे ओठ मऊ आणि सुंदर ठेवा

जायफळाची ही आयुर्वेदिक रेसिपी अनिद्रासाठी परिपूर्ण आहे

पांडा पेरेंटिंग म्हणजे काय, मुलांना वाढवण्यासाठी ते सर्वोत्तम का मानले जाते?

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Show comments