Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'उमेदवार असावा ऐसा गुंडा....'

वेबदुनिया
राज्यात पहिल्या टप्प्यात होणार्‍या १३ मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी 'उमेदवार व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' हा निकष लक्षात घेतलेला दिसतोय. या तेरा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेल्या तब्बल २४६ पैकी ४२ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यातील अनेकांवर गंभीर गुन्हे आहेत. (२४२ उमेदवारांचाच तपशील हाताशी लागला आहे.)

भंडारा-गोंदिया हा एकमेव मतदारसंघ कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांचा आहे. बाकी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक सात उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अमरावती व नांदेडमध्ये हेच प्रमाण सहा असे आहे. परभणीमध्ये फक्त एका उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत. बाकी प्रत्येक मतदारसंघात गुन्हे नोंदविलेले उमेदवार आहेतच.

विशेष म्हणजे साधनशुचितेच्या बाता मारणार्‍या भाजपच्या सातपैकी पाच उमेदवारांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. म्हणजे पक्षाचे ७१ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पण भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी कॉंग्रेसही फार मागे नाही. पक्षाने उतरवलेल्या आठपैकी चार उमेदवारांवर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. शिवसेनेने याबाबतीत कॉंग्रेसशी 'युती' केलेली असून त्यांचेही सहापैकी चार उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बाकी बहूजन समाज पक्षाचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक, समाजवादी पक्षाचा एक, अकरा अपक्ष व इतर पक्षांचे १४ उमेदवारही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

या सगळ्या उमेदवारांवर गुन्हेगारी आरोप असले तरी यापैकी फक्त चंद्रपूरहून आयएनडी या पक्षाचे उमेदवार असलेल्या मधुकर विठ्ठलराव निस्ताने यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले आहेत. यातील काही उमेदवारांवरील आरोप तर अतिशय गंभीर असे आहेत. हिंगोलीतून उभ्या असलेल्या विनायक श्रीराम भिसे यांच्यावर तर खून, खुनाचा प्रयत्न, दुसर्‍याला इजा करणे यासारखे गंभीर आरोप आहेत. हिंगोलीतील शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यावर लाच घेण्याचा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय दंगलीचाही आरोप आहे. नागपूरमधून उभे असलेल्या भाजपच्या बनवारीलाल पुरोहितांवर चोरीसह इतर बरेच आरोप आहेत. भाजपचेच गडचिरोलीतून उभे असलेले अशोक नेते, अकोल्यातील संजय धोत्रे, चंद्रपूरमधील हंसराज अहिर, नांदेडमधील संभाजी पवार यांच्यावरही काही ना काही गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेचे बुलढाण्यातील प्रतापराव जाधव, यवतमाळमधील भावना गवळी, अमरावतीतील आनंदराव अडसूळ यांच्यावरही काही गुन्हे आहेत. कॉंग्रेसचे नांदेडमधील उमेदवार भास्करराव खतगावकर, चंद्रपूरमधील नरेश पुगलिया, यवतमाळमधील हरिभाऊ राठोड, रामटेकमधील मुकूल वासनिक यांच्यावर गुन्हे आहेत. हिंगोलीतून उभ्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुर्यकांता पाटील यांच्यावरही गुन्हा आहे. पण यापैकी काहींवरचे गुन्हे फारसे गंभीर नाहीत.

हे सगळे पाहता, मतदारांनी अतिशय सावधगिरीने आणि विचार करून उमेदवारांना मत दिले पाहिजे. अन्यथा, कायदे बनविणार्‍या सभागृहात कायदे मोडणारी मंडळी पोहोचतील.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments