Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?

भाषा
आझम खान यांच्याशी असलेल्या मतभेदांची जाहिर वाच्यता करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पक्ष सोडून जाऊ अशी धमकी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, रात्री तातडीने त्यांनी या विधानाचा खुलासा करून घुमजाव केले. पण त्यांच्या या विधानाने समाजवादी पक्षातील मतभेद मात्र समोर आले आहेत.

मी हे जग सोडून जाईन, पण पक्ष सोडणार नाही, असे भावनात्मक विधान करून त्यांनी पक्षाशी कटिबद्धता दर्शविण्याचा प्रयत्न केला. आझम खान सातत्याने अमरसिंह यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या अमरसिंहांनी पक्षात 'एक तर मी राहिन किंवा खान' अशी भाषा केली होती.

अमरसिंहांची 'मैत्रिण' असलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रामपूर हे आझम खान यांचे गाव. त्यांनी जयाप्रदांबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. जयाप्रदा येथूनच गेल्यावेळी निवडून आल्या होत्या. मात्र, आझम खान यांना आता त्यांना विरोध आहे. याच मुद्यावरून त्यांचे अमरसिंहांशी वाजले.

' मी कुठे उभा आहे, याची मला कल्पना आहे. माझी सहनशक्ती ज्यावेळी संपेल, त्यावेळी मी मुलायमजी आणि पक्षाला रामराम ठोकेन', असे विधान अमरसिंहांनी काल केले होते. मात्र, या विधानाचे परिणाम जाणवायला लागल्यानंतर, माझे विधान संदर्भ सोडून दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ' आपल्यात काहीही मतभेद नाहीत. सगळे काही ठीक आहे, अशी सारवासारव त्यांनी केली. 'मुलायमसिंह हेच माझे नेते आहेत, त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यताच नाही, असे सिंग म्हणाले.


सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments