Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नात्याला थोडा ताजेपणा देऊ या!

वेबदुनिया
WD
कोणतीही गोष्ट शाश्वत नसते असे म्हटले जाते. नात्याच्या बाबतीतही हे खरे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, ओढ, काळजी या सर्व भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. एकमेकांबद्दल क्षणोक्षणी विचार करणार्‍या पती-पत्नीचे एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे केवळ पती-पत्नीच्या बाबतीत नव्हे तर प्रियकर-प्रेयसीच्या बाबतीतही घडते. स्त्रिया जास्त भावूक असल्याने त्याचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम उरलेले नाही हा विचार त्यंना सतातवत राहतो. मात्र, नात्याचा हा तिढा कसा सोडवावा हे उमगत नाही. पतीचे आपल्यावरील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेले नसले तरी ते कमी झाले आहे, हे वारंवार जाणवते. अशा वेळी डोके धरुन बसण्यात काय अर्थ आहे?

चला, नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने माझ्यासाठी अमूक केले पाहिजे, ती माझी जबाबदारी नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाबीमध्ये दोघांनी समान वाटा उचलावा, म्हणजे एकावर दडपण येणार नाही. आणि एकमेकांच्या साथीने काम पूर्णही होईल.

स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते. त्या स्वत:ची गाडी पुढे दामटवण्यात इतक्या रमतात की समोरच्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. यामुळेही नात्यात दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा जोडीमाराचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Show comments