Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खेळ सातबाराचा

चंद्रकांत शिंदे
PR
शेतकर्‍यांच्या जमीन बळकाव प्रकरणावर आधारि त

गिरणी कामगार, शिक्षणाचा बट्याबोळ या समस्यांबरोबरच सध्या महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमीनी बळकावण्याचे काम पद्धतशीरपणे सुरु आहे. उद्योगपतींच्या मांडीला मांडी लावून बसणारे राजकारणी शेतकर्‍यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानेच पुसत आहेत. हाच विषय घेऊन खेळ सातबाराचा, खेळ संपणार कधी हा मराठी चित्रपट १६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

भाऊसाहेब भोईर निर्मित आणि अजित शिरोळे दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी कणखर जिल्हाधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. रत्नाकर खोब्रागडे नावाचा हा जिल्हाधिकारी गावातील गरीब शेतकर्‍याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ ऍटर्नी घेऊन जमीनी बळकावणारे स्थानिक गुंड व यात सामिल असलेल्या सरपंच, आमदार ते थेट उद्योगपतींपर्यंत धडक मारतो आणि भूमीहीन होणार्‍या शेतकर्‍यांच्या बाजूने उभा रहातो. चित्रपटाची कथा निर्माते भाऊसाहेब भोईर यांनीच लिहिलेली असून पटकथा संवाद संजय पवार यांचे आहेत. चित्रपटाला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले असून लता मंगेशकर, आशा भोसले आणि बैजनाथ मंगेशकर यांनी गीते गायली आहेत.

चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात कवी ग्रेस यांच्या निवडक कवितांच्या ओळी प्रसंगानुरूप वापरलेल्या आहेत. संदीप कुलकर्णीसोबत चित्रपटातील अन्य कलाकार आहेत प्रतीक्षा लोणकर, शर्वरी जमेनीस, अनंत जोग, मोहन आगाशे, गिरीश ओक आणि मोहन जोशी.
सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; यूट्यूब चॅनेल्सवर पसरणाऱ्या अश्लीलतेबद्दल सरकार काय करत आहे?

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

Show comments